आमच्‍या व‍िषयी

महाराष्ट्रातील माळी समाजातील उद्योजकांची जिल्हावार ‘उद्योजक सूची’ तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘माळीउदयोजक डॉट कॉम’ने हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात लहान-मोठा उद्योग करणार्‍या प्रत्येक मााळी उद्योजकाची नोंद या सूचीमध्ये करत आहोत. ‘‘माळीउदयोजक डॉट कॉम’’च्या संकेतस्थळावर (www.maliudyojak.com) ही सूची सर्व माळी समाजासाठी  आहे याचे जिल्हावार प्रकाशित केले जाणार आहेत.

या उद्योजक सूचीमध्ये उद्योजकाचे नाव, पत्ता, त्याच्या व्यवसायाची माहिती तसेच त्याचा उद्योजकीय प्रवास, फोटो / व्हिडीओ  गॅलरी इ. माहीती देत आहोत. म्हणजे ही उद्योजकाची एक परिपूर्ण प्रोफाइल तयार होऊ शकेल. ही वेब बेस्ड असल्यामुळे उद्योजकाच्या नावे स्वतंत्र वेबपेज (उदा. https://maliudyojak.com/manasi-infotech) तयार होईल. या प्रकल्पाचा एक उद्देश माळी उद्योजकांना समाजात अधिकाधिक visibility मिळावी हा असल्यामुळे ‘‘माळीउदयोजक डॉट कॉम’’च्या सोशल मीडियावरूनही हे पेज प्रसारित केले जाईल, म्हणजे लाखो माळी  समाजातील लोकांपर्यंत माळी उदयोजक पोहचुु शकेल. 

संस्‍थापक – श्री. मुकुंद किसनराव पेहेरे

फेसबुक